आयआयटी गुवाहाटीने शोधला ‘एसी’ला पर्याय

आयआयटी गुवाहाटीने शोधला ‘एसी’ला पर्याय

belgavkar.com | belgaum | belgavkar

गुवाहाटीतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मधील संशोधकांनी वातानुकूलित यंत्राला पर्याय ठरू शकेल, अशा रेडिएटिव्ह कुलर कोटिंग मटेरिअलचा आराखडा तयार केला असून त्यासाठी विजेची देखील गरज भासणार नाही. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मटेरिअल म्हणजे विद्युतमुक्त शीतप्रणाली आहे तिचा वापर छतावर देखील करता येतो. दिवसा आणि रात्री तिचा प्रभावीपणे वापर करणे सहज शक्य आहे. पॅसिव्ह रेडिएटिव्ह कुलिंग प्रणाली सभोवतालच्या वातावरणातील उष्मा इन्फ्रारेड रेडिएशनच्या माध्यमातून शोषून घेते आणि त्यानंतर त्याच उष्म्याचे उत्सर्जन देखील केले जाते. यामुळे ज्या ठिकाणी ही प्रणाली बसविण्यात आली आहे ती जागा पूर्णपणे थंड होण्यास मदत होते.
सर्वाधिक पॅसिव्ह रेडिएटिव्ह कुलर हे केवळ रात्रीच वापरण्यात येतात. दिवसामात्र या कुलरला काम करण्यासाठी सगळ्या सौर किरणांना परावर्तित करावे लागते, असे आयआयटी गुवाहाटीमधील संशोधक आशिषकुमार चौधरी यांनी सांगितले. आतापर्यंत काही कुलिंगप्रणाली या दिवसा पुरेशाप्रमाणामध्ये थंडावा निर्माण करत नसल्याचे आढळून आले होते. आम्ही हीच समस्या ध्यानात घेऊन परवडणारी आणि अधिक प्रभावी अशी प्रणाली तयारी केली असून ती चोवीस तास काम करू शकते असे या संशोधकांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ फिजिक्स डी-अप्लाईड फिजिक्स’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आयआयटी गुवाहाटीने शोधला ‘एसी’ला पर्याय

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm