बेळगाव : नाझर कॅम्प ते येळ्ळूर रोडवरील केएलईपर्यंत, विकासासाठी ₹ 5 कोटी रुपये मंजूर

बेळगाव : नाझर कॅम्प ते येळ्ळूर रोडवरील केएलईपर्यंत, विकासासाठी ₹ 5 कोटी रुपये मंजूर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वडगावमधील नाझर कॅम्प ते येळ्ळूर रोडवरील केएलईपर्यंत पदपथ तसेच वॉकिंग ट्रॅकनिर्मितीची मागणी केली जात होती. त्यानुसार त्याला मंजुरी मिळाली असून, या कामांसह ड्रेनेजवाहिनीसाठी ₹ 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दरम्यान, याबाबतचा कृती आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. वडगावमधील नाझर कॅम्प आणि येळ्ळूर रोड भागातील रहिवासी सातत्याने वॉकिंग ट्रॅक तसेच येथे पदपथ उभारण्याची मागणी करत होते. यासंदर्भात अनुदानाची तरतूद करण्यात आली असून, पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्यानुसार आता या पदपथाची रुंदी 10 फूट तर लांबी सुमारे दीड किलोमीटर असेल. या भागामध्ये कॉलनीत पावसाचे पाणी साचत होते. त्यामुळे याठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था विकसित केली जात आहे. येथे गटारींची निर्मिती केली जात आहे. या भागातील तिन्ही कामांसाठी सुमारे पाच कोटी रुपये अपेक्षित असून, हा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याबाबत नियोजन आहे. दरम्यान, विषयाची विस्तृत माहिती आमदार अभय पाटील यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातूनही दिलेली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : नाझर कॅम्प ते येळ्ळूर रोडवरील केएलईपर्यंत, विकासासाठी ₹ 5 कोटी रुपये मंजूर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm