बेळगाव : 'आम्ही चाललोय, तुम्हीही या, बेळगाव...', सुनावणी लांबणीवर

बेळगाव : 'आम्ही चाललोय, तुम्हीही या, बेळगाव...', सुनावणी लांबणीवर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सोशल मीडियावर 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची जागृती केल्याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिघांवर गुन्हा नोंदवला आहे. या खटल्याची होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. 2017 मध्ये महाराष्ट्र एकीकरण काळ्यादिनानिमित्त 1 समितीने नोव्हेंबर रोजी मूक फेरीचे आयोजन केले होते. या फेरीत लोकांनी सहभागी होण्यासाठी दत्ता येळ्ळूरकर, केदारी करडी आणि मारूती पाटील यांनी 'सोशल मीडियावर आम्ही चाललोय, तुम्हीही या, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा आशयाचा मजकूर टाकला होता.
या मजकुरामुळे भाषिक तेढ निर्माण झाली, असा आरोप करत खडेबाजार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तिसऱ्या जेएमएफसी न्यायालयात बुधवारी सुनावणी होती. पण, न्यायाधिशांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी 27 जुलैपर्यंत लांबणीवर पडली आहे. समिती कार्यकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. महेश बिर्जे, अ‍ॅड. प्रताप यादव आणि अ‍ॅड. बाळासाहेब काकतकर हे काम पाहात आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'आम्ही चाललोय, तुम्हीही या, बेळगाव...', सुनावणी लांबणीवर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm