बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

belgavkar.com | belgaum | belgavkar

सर्व अनुदानित अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश

विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी 25 टक्के सवलत

बेळगाव : महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या सीमाभागातील 865 गावांतील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अनुदानित अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी 25 टक्के सवलत देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी बेळगाव, भालकी, निपाणी येथे विद्यार्थ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिनोळी येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जागेची पाहणी करून पहिल्या टप्प्यात व्यावसायिक अभ्यासक्रम जाहीर केले होते.
त्यानंतर विद्यापीठाने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभ्यासक्रम आणि वसतिगृहासाठी सवलत जाहीर केली आहे. याचा लाभ सीमाभागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. अनुदानित अभ्यासक्रमांसाठी ही सवलत योजना लागू आहे. अनुदानित अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ तर विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी 25 टक्के शुल्क पान 5 वर सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसतिगृहासाठीची फी माफ करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बेळगाव येथे 26 रोजी सकाळी 11 वा. संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, खानापूर रोड, तसेच भालकी येथे 28 रोजी सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज भालकी (बिदर) तर निपाणी येथे 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. देवचंद महाविद्यालय निपाणी येथे बैठक आयोजित केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
सर्व अनुदानित अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm