'मूंछे हो तो शायजा जैसी वरना ना हों', 'ही' महिला मिशांमुळे चर्चेत

'मूंछे हो तो शायजा जैसी वरना ना हों', 'ही' महिला मिशांमुळे चर्चेत

belgavkar.com | belgaum | belgavkar

केरळच्या महिलेला वाटतो तिच्या मिशांचा अभिमान, कोण आहे पिळदार मिशांवर ताव मारणारी शायजा?

जास्त केस असणे ही समस्या पुरुष आणि स्त्री या दोघांना असतातच. पुरुषांना या समस्येचा जास्त त्रास होत नाही. पण महिलांना मात्र या समस्येचा जास्त त्रास होतो. कारण तोडांवर आणि हातावर असलेल्या महिलांचे केस नेहमीच चार चौघांच्या चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र त्या चार चौघांची पर्वा न करता एक महिला बिनधास्तपणे चेहऱ्यावर मिशा मिरवतेय, आणि या गोष्टीचा अभिमान असल्याचेही ती सांगतेय. त्यामुळे या महिलेची ही हटके स्टोरी आहे तरी काय जाणून घेऊयात.  स्त्रियांना नेहमीच सांगितलं जातं की, चेहऱ्यावर केस असू नये, शिवाय असतील तर ते काढावेत. पण केरळमधील शायजा (वय 35) ही महिला अभिमानाने आपल्या मिशांवर ताव मारते. आपल्या पिळदार मिशांमुळे शायजा सध्या चर्चेत आहे. शायजा मुळची केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील आहे. पुरूषांप्रमाणे शायजाला देखील मिशा आहेत.
तिच्या या मिशांमुळे नातेवाईकांसह शेजाऱ्यांनी देखील तिची चेष्टा केली. परंतु शायजाच्या पती आमि मुलांनी तिला यासाठी पाठिंबा दिला. शायजा सांगते की, मला मिशी ठेवायला आवडते आणि ती काढण्याची गरज आहे असे मला कधीच वाटलं नाही. एवढेच नाही तर आपल्या तावदार मिशांवर हात मारत शायजा मिशी वाढली आहे त्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगते. शायजा सांगते, जगाने माझ्याबद्दल काय विचार केला याची मला पर्वा नाही. पण आता मी मिशीशिवाय राहू शकत नाही. शायजाचे आपल्या मिशीवर एवढे प्रेम आहे की, कोरोना महामारीच्या वेळी तिला मास्क  घालणे आवडत नव्हते. कारण त्याने तिचा चेहरा झाकला जाई आणि मिशा लपवल्या जात असत. मला जे आवडते ते मी करते, असे शायजा सांगते. 
शायजा गेल्या दहा वर्षांत अनेक ऑपरेशन्समधून गेली आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बाहेर पडून शायजा इतकी मजबूत झाली आहे की, आता तिला कोणाचीही पर्वा नाही. शायजाला वाटते की, असे जीवन जगले पाहिजे जे आपल्याला आनंदी करेल. शायजा सांगते, गेल्या पाच वर्षांपासून वरच्या ओठांवरील केस दाट व्हायला लागले. कालांतराने ते मिशीसारखे दिसू लागले. या बदलामुळे मला खूप आनंद झाला. त्यामुळे मी ओठावर मिशी वाढवण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी मला मिशी काढून टाकण्याचा सल्ला दिला. परंतु, मला माझ्या मिशांचा अभिमान असल्यामुळे मी त्या काढणार नाही, तर आणखीन जास्त वाढवणार आहे.   शायजा हिची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तिने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

'मूंछे हो तो शायजा जैसी वरना ना हों', 'ही' महिला मिशांमुळे चर्चेत
केरळच्या महिलेला वाटतो तिच्या मिशांचा अभिमान, कोण आहे पिळदार मिशांवर ताव मारणारी शायजा?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm