पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राहुल गांधीनी बदललेल्या 'डीपी'ची चर्चा

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राहुल गांधीनी बदललेल्या 'डीपी'ची चर्चा

belgavkar.com | belgaum | belgavkar

पंतप्रधान मोंदी यांनी स्वत: त्यांच्या सोशल मिडीयाचे डीपी बदलून राष्ट्रध्वज ठेवला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाची घोषणा केली होती. या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा' अभियानही राबवण्यात येत आहे. या 'हर घर तिरंगा' अभियानानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या सोशल मीडियावरील खात्यांचे डीपी बदलवून राष्ट्रध्वजाचा फोटो ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोंदी यांनी स्वत: त्यांच्या सोशल मिडीयाचे डीपी बदलून राष्ट्रध्वज ठेवला. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील प्रतिसाद दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलचा डीपी बदलून माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे.
राहुल गांधी यांनी माजी जवाहरलाल नेहरू यांचा राष्ट्रध्वज हातात घेतलेला फोटो डीपीमध्ये ठेवला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ”तिरंगा हा देशाचा अभिमान आहे. तो प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आहे”, असेही कॅप्शन दिले आहे. राहुल गांधींना डीपी बदलल्यापासून नेहरूंचा तिरंगा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहरूंचा फोटो लावून काँग्रेसने आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सांस्कृतिक मंत्रालयातर्फे तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड यांनी तिरंगा रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली लाल किल्ल्यावरून विजय चौकापर्यंत काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपी बदलल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपापले डिपी बदलण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, भाजप नेते यांच्याशिवाय सर्वसामान्यांनीही आपले डीपी बदलले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राहुल गांधीनी बदललेल्या 'डीपी'ची चर्चा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm