बेळगावचे स्थानिक आमदारच महापौर आणि उपमहापौर

बेळगावचे स्थानिक आमदारच महापौर आणि उपमहापौर

belgavkar.com | belgaum | belgavkar

काँग्रेसतर्फे दोन्ही आमदारांना महापौर व उपमहापौरांचा गाऊन आहेर दिला जाईल

बेळगाव : बेळगावची महापौर-उपमहापौर निवडणूक झालेली नाही, पण भाजपचे स्थानिक आमदार सध्या महापौर व उपमहापौराची भूमिका बजावत आहेत. कर्नाटक राज्यातील 2023 च्या विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत. भाजपचे स्थानिक आमदारच महापौर-उपमहापौर राहतील. काँग्रेसकडून त्यांचे अभिनंदन करुन भेटवस्तू देण्यात येणार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली. त्यामुळे 9 ऑगस्टला काँग्रेसतर्फे दोन्ही आमदारांना महापौर व उपमहापौरांचा गाऊन आहेर दिला जाईल, काँग्रेस भवनात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना आ. जारकीहोळी म्हणाले, मेकेदाटू योजनेसाठी राज्यात काँग्रेसकडून पदयात्रा सुरू आहे. पदयात्रेची सांगता 9 रोजी काँग्रेस भवन येथे करण्यात येणार आहे. या सांगता कार्यक्रमाला केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार उपस्थितराहणार आहेत. त्याचवेळी महापौर, उपमहापौर असणार्‍या स्थानिक आमदारांना काँग्रेस पक्षाकडून भेटवस्तू पाठवून देण्यात येणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावचे स्थानिक आमदारच महापौर आणि उपमहापौर
काँग्रेसतर्फे दोन्ही आमदारांना महापौर व उपमहापौरांचा गाऊन आहेर दिला जाईल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm