बेळगाव : बेळगाव दक्षिणमध्ये 90 ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे 256 कॅमेरे

बेळगाव : बेळगाव दक्षिणमध्ये 90 ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे 256 कॅमेरे

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव दक्षिण मतदार संघात अत्याधुनिक यंत्रणा

शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे कॅमेरे

बेळगाव : वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याबरोबर रहदारीला शिस्त लागावी म्हणून बेळगाव दक्षिण मतदार संघात अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासाठी 90 ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे 256 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कामाला आमदार अभय पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे कॅमेरे बसवण्यास प्रारंभ करण्यात आला.
आ. अभय पाटील म्हणाले, 90 ठिकाणी अत्याधुनिक 256 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांचा उपयोग चोरी, महिलांची छेडछाड आदी घटना रोखण्याबरोबर शहर, उपनगरातील रहदारीची समस्या सोडवण्यासाठी होणार आहे. या यंत्रणेसाठी ₹ 3 कोटी 20 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळीही स्पष्ट चित्रीकरण या कॅमेऱ्यांद्वारे होणार आहे. यावेळी पोलिस उपायुक्त सदाशिव कट्टीमणी, शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक बडिगेर उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळगाव दक्षिणमध्ये 90 ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे 256 कॅमेरे
बेळगाव दक्षिण मतदार संघात अत्याधुनिक यंत्रणा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm