बेळगाव : या आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर महिला अपघातात ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - गोकाक : गोकाक शहरा लगतच्या संकेश्वर-सौंदत्ती मार्गांवरील आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने साधारण 60 ते 65 वयोगटातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याबाबत गोकाक शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, रविवारी रात्री 11 ते साडेअकरा अनोळखी महिलेला अज्ञात वाहनाची धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी या परिसरसतील गावात ओळख पठविण्याचा प्रयत्न केला असता ओळख पटू शकली नाही. घटनेची गोकाक शहर पोलिसात नोंद असून पोलीस निरीक्षक गोपाळ राठोड अधिक तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : या आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर महिला अपघातात ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm