बेळगाव : अनोळखी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार

बेळगाव : अनोळखी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - निपाणी : अनोळखी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे सहा वाजता घडली. अलगोंडा बसाप्पा खोत (वय 35, रा. वाळकी, ता. चिकोडी) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत खडकलाट पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अलगोंडा खोत हे कोल्हापूर येथील एमआयडीसीत बऱ्याच वर्षांपासून काम करत आहेत. नेहमीप्रमाणे ते दुचाकीवरून (केए 23, पी 5483) वाळकी येथून कोल्हापूरकडे निघाले होते.
दरम्यान, निपाणी-चिकोडी मार्गावरील महात गोदामाजवळ आल्यानंतर त्यांना पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अनोळखी वाहनाची धडक बसली. या अपघातात खोत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे खडकलाट उपनिरीक्षक लक्ष्मण अरी, हवालदार आर. एस. नदाफ, एन. एच. पुजारी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर धडक दिलेल्या अनोळखी वाहनाचा तपास सुरू केला आहे. खडकलाट पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. अलगोंडा यांच्या मागे पत्नी, आई, भाऊ, भावजय, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. खोत कुटुंबामध्ये अलगोंडा हा कर्ता पुरुष असल्याने त्याच्या अपघाती मृत्यूमुळे वाळकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अनोळखी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm