बेळगाव : हिंदवाडीत रिक्षावर झाड कोसळले

बेळगाव : हिंदवाडीत रिक्षावर झाड कोसळले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सर्वोदय कॉलनी हिंदवाडी येथे रिक्षावर झाड कोसळून 80000 रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ज्यावेळी रिक्षावर झाड कोसळले त्यावेळी रिक्षात कोणीही नव्हते. रिक्षाचालक अंकुश पवार यांनी नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळ रात्री रिक्षा लावली होती. पवार यांनी प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू होती, परंतु पावसाने बुधवारी काही प्रमाणात उसंत घेतली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात पावसासह जोराने वारा वाहत आहे. त्यामुळे वारा आणि पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी घरे कोसळण्यासह जुनी झाडेही उन्मळून पडत आहेत. बुधवारी सकाळी हिंदवाडी सर्वोदय कॉलनी येथील एक झाड रिक्षावर कोसळले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हिंदवाडीत रिक्षावर झाड कोसळले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm