बेळगाव : मृत्यूला चकवा...! केवळ दैव बलवत्तर म्हणून ते दोघेही भाऊ बचावले…

बेळगाव : मृत्यूला चकवा...!
केवळ दैव बलवत्तर म्हणून ते दोघेही भाऊ बचावले…

belgavkar.com | belgaum | belgavkar

देव तारी त्याला कोण मारी, इतक्या भीषण अपघातातूनही बचावले Video

हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

बेळगाव सोशल मीडियावरचे काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करतात. सामान्य नागरिकांना आश्चर्य वाटतं यात काही नवल नाही, पण कधीकधी असे व्हिडिओ मोठ्या असामींनाही तोंडात बोटं घालायला लावतात. मराठी मध्ये एक प्रसिद्ध अशी म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी...! या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भीषण अपघातातून दोघे भाऊ चमत्कारिकरित्या बचावले आहेत. या अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना बेळगाव-बागलकोट महामार्गावर निलजी जवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली आहे. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (cctv) कैद झाला आहे. भरधाव जाणाऱ्या बस खाली येऊन देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघे भाऊ या अपघातातून बचावले आहेत. यामुळेच काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. दोघा भावांनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला.
बसवण कुडची येथील सुभाष कल्लाप्पा बेडका (वय 40) आणि सुधीर नागप्पा बेडका (वय 26) हे दोघे चुलत भाऊ प्रत्यक्ष मृत्युच्या दाढेतून परत आलेत. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हे दोघेही सुदैवाने बचावले आहेत. बेळगावहुन जमखंडीला जाणाऱ्या सौंदत्ती बस डेपोच्या परिवहन महामंडळाच्या बसने मागून दुचाकीला धडक दिली. मात्र केवळ सुदैवाने दुचाकीवर बसलेले दोघेही वाचले.
बस चालकाने शर्तीचे प्रयत्न करून बस नियंत्रणात आणली. बेळगाव-बागलकोट महामार्गावर निलजी जवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजता हा अपघात घडला. बसवन कुडची येथून सांबऱ्याकडे जाणारी दुचाकी निलजी येथे कुबेर धाब्याजवळ उजव्या बाजूला वळण घेत असताना बसने मागून दुचाकीला ठोकर दिली. अपघातात एकजण बाजूला पडला तर एक जण बसच्या चाका खाली आला. मात्र बस चालकाने शर्तीचे प्रयत्न करून वेळेत बस नियंत्रणात आणली यामुळे दोघीही वाचले. सदर घटनेत एकजण एक जण किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही भावंडांनी अनुभवलेला मृत्यूचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जखमींना लागलीच उपचारासाठी बिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. मारिहाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मृत्यूला चकवा...! केवळ दैव बलवत्तर म्हणून ते दोघेही भाऊ बचावले…
देव तारी त्याला कोण मारी, इतक्या भीषण अपघातातूनही बचावले Video

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm