बेळगाव : कार-ट्रक अपघातात 1 ठार, 5 जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील (NH4) बेळगाव तालुक्यातील बेन्नाळी गावाजवळ झालेल्या अपघातात एक ठार आणि पाचजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. अकिमराज इर्शाद अहमद बहाद्दूरशहा (वय 26, रा. नेहरूनल वेस्ट, नवी मुंबई) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर जखमी पाचजणांवर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी की, संशयित सहाद इसाक खाजी (वय 32, रा. रविवार पेठ, पुणे) कारने मुंबईहून बंगळूरला निघाले होते. कार पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील होनगा गावाजवळील बेन्नाळीजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले व दुभाजकाला धडक दिली. त्यामध्ये बेळगावकडे येणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे कारमधील पाचजण जखमी झाले.
त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. अकिमराज यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. इर्शाद बहाद्दूरशाह (वय 62), सैमा अकीमराजा बहाद्दूरशहा (22), मिश्रादनाज इर्शाद बहाद्दूरशहा (34), अजियाअक्सा अकिमराजा बहाद्दूरशहा (2 महिने) आणि अबीर शेख (8, सर्व रा. मुंबई) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काकती पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद आहे

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कार-ट्रक अपघातात 1 ठार, 5 जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm