बेळगाव : खासगी बस झाडावर आदळून तिघे जखमी

बेळगाव : खासगी बस झाडावर आदळून तिघे जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - खानापूर : रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ (ता. खानापूर) खासगी बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एक प्रवासी जखमी झाला आहे. बेंगळुरूहून गोव्याला जाणारी नागश्री ट्रॅव्हल्सची खासगी बस रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर कोसळली. रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ आज सकाळी 8.00 च्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातात बस चालक आणि वाहकासह एक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी इस्पितळात दाखल केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खासगी बस झाडावर आदळून तिघे जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm