अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर काय परिणाम?
झटपट चेक करा लेटेस्ट दर

belgavkar.com | belgaum | belgavkar

कच्च्या तेलाच्या किमती काय?

दर 15 दिवसांनी कच्चं तेल, डिझेल-पेट्रोल आणि विमान इंधनावर लादलेल्या नवीन कराचा आढावा घेईल

जुलै महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, सरकार दर 15 दिवसांनी कच्चं तेल, डिझेल-पेट्रोल आणि विमान इंधनावर (ATF) लादलेल्या नवीन कराचा आढावा घेईल. क्रूडच्या किमतीत घसरण झाल्यानंतर आणि अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती खाली येतील, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडूनही व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाची घसरण आणि तेल कंपन्यांचं होणारं नुकसान यांमुळे तेलाच्या किमतींत कोणताही बदल होण्याची तज्ज्ञांना अपेक्षा नाही.
गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी सरकारनं तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. 
कच्च्या तेलाच्या किमती काय?
गेल्या काही दिवसांत प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरत आहेत. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 94.02 डॉलरपर्यंत घसरली. तर, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 99.34 डॉलरवर घसरल्याचं दिसून आलं. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारनं पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात करून राज्यातील जनतेला दिलासा दिला होता. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर काय परिणाम? झटपट चेक करा लेटेस्ट दर
कच्च्या तेलाच्या किमती काय?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm