बेळगाव : दुचाकींच्या धडकेत व्यापारी ठार

बेळगाव : दुचाकींच्या धडकेत व्यापारी ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - निपाणी : निपाणी-मुरगूड मार्गावर श्रीनगर वळणावर दुचाकींच्या धडकेत लाकूड व्यापारी ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत. रमेश विश्राम पटेल (वय 51, रा. श्रीनगर, निपाणी) असे मृताचे नाव आहे. गुरूवारी हा अपघात घडला होता. पटेल यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. रमेश पटेल गुरुवारी रात्री वखार बंद करून दुचाकीवरून घराकडे जात होते. ते श्रीनगर वळणावर आले असता समोरून येणार्‍या दुचाकीची धडक त्यांना बसली. यामध्ये पटेल यांच्यासह दुचाकीवरील विनीत अमरमड्डी (रा. पट्टणकुडी) महेश रमेश सूर्यवंशी हे तिघेजण गंभीर जखमी झाले.
रमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : दुचाकींच्या धडकेत व्यापारी ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm