बेळगाव : भीषण अपघातातील त्या युवकाचा मृत्यू

बेळगाव : भीषण अपघातातील त्या युवकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता

बेळगाव : बेळगाव-बागलकोट महामार्गावर निलजी जवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजता भीषण अपघात घडला होता. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (cctv) कैद झाला. भरधाव जाणाऱ्या बस खाली येऊन केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघे भाऊ या अपघातातून दोघे बचावले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी अपघातातील गंभीर जखमी झालेल्या बसवण कुडची येथील सुभाष कल्लाप्पा बेडका (वय 42, शिवाजी गल्ली, बसवण कुडची) याचा मृत्यू झाला आहे.
बसवण कुडची येथील सुभाष आणि सुधीर नागप्पा बेडका (वय 26) हे दोघे चुलत भाऊ दुचाकीवरून जात होते. बसवन कुडची येथून सांबऱ्याकडे जाणार्‍या दुचाकीला निलजी येथील कुबेर धाब्याजवळ उजव्या बाजूला वळण घेत असताना बेळगावहुन जमखंडीला जाणाऱ्या सौंदत्ती बस डेपोच्या परिवहन महामंडळाच्या बसने मागून ठोकर दिली. बस चालकाने शर्तीचे प्रयत्न करून बस नियंत्रणात आणली. बेळगाव-बागलकोट महामार्गावर निलजी जवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजता हा अपघात घडला. सुभाषच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलं आणि भाऊ आहेत. मारिहाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : भीषण अपघातातील त्या युवकाचा मृत्यू
हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm