belgaum-khanapur-a-man-was-arrested-for-poaching-a-rare-wild-boar-monitor-202208.jpg | बेळगाव - खानापूर : जंगलात दुर्मिळ अशा घोरपडीची शिकार करणाऱ्या एकाला अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव - खानापूर : जंगलात दुर्मिळ अशा घोरपडीची शिकार करणाऱ्या एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खानापूर : तावरगट्टी (ता. खानापूर) येथील जंगलात दुर्मिळ अशा घोरपडीची शिकार करणाऱ्या एकाला शुक्रवारी गोलीहळ्ळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत घोरपडीसह ताब्यात घेतले. मायकल मरेप्पा आंबेवाडकर (वय 34) असे संशयित आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी तावरगट्टी जंगलातील वन सर्व्हे नं. 26 मध्ये सदर शिकारीने घोरपडीची शिकार केली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळाली.
लागलीच डीसीएफ अँथनी मरियप्पा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी मायकल यास ताब्यात घेतले. याप्रकरणी गोलीहळ्ळी वनविभागात गुन्ह्याची नोंद झाली आहे. नागरगाळी एसीएफ शिवरुद्रप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली, गोलाहळ्ळीच्या आरएफओ वनश्री हेगडे, उपविभागीय वन अधिकारी डॉ. कुमारस्वामी हिरेमठ, अनिल साळुंखे व कर्मचारी तपासात सहभागी झाले होते.