ATS ची मोठी कारवाई; 11 बनावट पासपोर्टसह 2 बांगलादेशींना अटक

ATS ची मोठी कारवाई;
11 बनावट पासपोर्टसह 2 बांगलादेशींना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

मोहम्मद मुस्तफा आणि मोहम्मद हुसेन शेख

दिल्ली पोलिसांनी 15 ऑगस्टपूर्वीच 2 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या ओळखीचे 11 बांगलादेशी पासपोर्ट आणि 10 बनावट रबर शिक्के जप्त करण्यात आले आहेत. मोहम्मद मुस्तफा आणि मोहम्मद हुसेन शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका जिल्ह्यात 15 ऑगस्टपूर्वी ही तपासणी मोहीम राबवली जात होती. यादरम्यान दुकानदारांना बाजारात काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांना कळवण्याचा इशारा देण्यात आला. तसेच या जिल्हात भाडेकरांची आधिकृत माहिती गोळाकरण्याचे काम चालु होते.

belgavkar

या कारवाईत ATS अधिकारी हरिओम आणि कॉन्स्टेबल महेश यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पालम एक्स्टेंशनमधील रामफळ चौकात पोहोचले असता, तिथे एका घरातून मोहम्मद मुस्तफा आणि हुसेन शेख यांना पकडले. दोघांच्या घराची झडती घेतली असता तिथून 11 बांगलादेशी पासपोर्ट सापडले, ज्यात त्यांचे फोटो होते, पण नावे आणि पत्ते वेगळे होते. याशिवाय बांगलादेशातील विविध मंत्रालये आणि सरकारी कार्यालयांचे शिक्केही जप्त करण्यात आले आहेत.
success 15th

august bangladeshi

arrested 11

fake passports

up ats
Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm