घरावर तिरंगा फडकवल्यावर अवघ्या 2 मिनीटांत डाऊनलोड करा हर घर तिरंगा सर्टिफिकेट

घरावर तिरंगा फडकवल्यावर अवघ्या 2 मिनीटांत डाऊनलोड करा हर घर तिरंगा सर्टिफिकेट

belgavkar.com | belgaum | belgavkar

घरोघरी तिरंगा फडकवणाऱ्या देशवासियांना प्रमाणपत्र मिळणार

देशातील नागरिक घरोघरी तिरंगा फडकवत “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करत आहेत. हर घर तिरंगा या मोहिमेत (Har Ghar Tiranag Certificate) सहभागी होणाऱ्यांसाठी सरकारने प्रत्येक घरासाठी तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. घरावर तिरंगा फडकवल्यावर नागरीक या पोर्टलला भेट देऊन अवघ्या दोन मिनीटांत हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकतात. देशवासीय फार पूर्वीपासून ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहेत. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन खूप खास आहे कारण उद्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी भारत सरकारने “हर घर तिरंगा” मोहीम सुरू केली आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअँप यांसारख्या सोशल साइट्सवर देशवासियांना राष्ट्रध्वज हा त्यांचा प्रोफाईल पिक्चर म्हणून लावावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याचबरोबर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठीही त्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी झालेले त्यांचे “हर घर तिरंगा” प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.
“हर घर तिरंगा” प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे
“हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवणाऱ्या देशवासियांना प्रमाणपत्र मिळणार आहे. यासाठी सरकारने वेबसाइट तयार केली आहे. वापरकर्ते “हर घर तिरंगा” वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात. 
“हर घर तिरंगा” प्रमाणपत्र डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स
यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर https://harghartiranga.com/ वेबसाइट ओपन करा.
यानंतर तुम्हाला केशरी रंगात दाखवलेल्या Pin a Flag पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचे लोकेशन सिलेक्ट करा.
त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पिक्चर टाकावा लागेल. प्रोफाइल पिक्चर अपलोड केल्यानंतर नाव आणि मोबाईल नंबर टाका. प्रोफाईल पिक्चर अपलोड न करता तुम्ही पुढील प्रक्रियेवर जाऊ शकता. त्यानंतर Next वर क्लिक करा.
पुढील स्टेपमध्ये तुमच्या तिरंग्याची स्थिती चिन्हांकित करा. तुमच्या पिन कोड सहित लोकेशन सिलेक्च करुन  प्रमाणपत्र तयार केले जाईल.

यानंतर तुम्ही हे प्रमाणपत्र डाउनलोड किंवा शेअर करू शकता. प्रमाणपत्र तुमच्या फोनवर PNG इमेजच्या फॉरमॅटमध्ये डाउनलोड केले जाईल. जे लोक हर घर तिरंगा अभियानाचा भाग बनले आहेत ते त्यांच्या घरी तिरंगा ध्वज लावून प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात किंवा प्रिंट आऊट घेऊन ते घरी ठेवू शकतात. स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

घरावर तिरंगा फडकवल्यावर अवघ्या 2 मिनीटांत डाऊनलोड करा हर घर तिरंगा सर्टिफिकेट
घरोघरी तिरंगा फडकवणाऱ्या देशवासियांना प्रमाणपत्र मिळणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm