want-to-have-sex-on-a-video-call-beware-if-you-have-message-on-whatsapp-202208.jpg | सावधान....! Video कॉलवर सेक्स करणार का?; WhatsApp वर मेसेज आला असेल तर... | belgaum news | belgavkar बेळगावकर

सावधान....! Video कॉलवर सेक्स करणार का?; WhatsApp वर मेसेज आला असेल तर...

belgavkar.com | belgaum | belgavkar

एका अज्ञात नंबरवरून हायचा मेसेज आला. त्यानंतर त्याला रिप्लाय दिला.

सेक्सटॉर्शन गँग फेसबुकच्या माध्यमातून बनावट फोटो बनवून पीडितांना शिकार बनवतात.

एका प्रसिद्ध युवा डॉक्टरच्या निवृत्त झालेल्या वडिलांनी लज्जास्पद आणि घाबरलेल्या स्थितीत फोन करून मी बर्बाद झालोय, मी मरतोय असं म्हटलं. मुलानं कठीण प्रसंगात त्यांना रोखलं आणि हा प्रकार उघडकीस आला. अश्लील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीची धमकी अन् त्यातून आत्महत्या करण्यापर्यंत घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित व्यक्तीकडे 20 लाखांची मागणी करण्यात आली. त्यातील 5 लाखांची रक्कम व्यक्तीने दिली होती.  सध्या अशाप्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विना अपहरण, दरोडा न घालता समोरील व्यक्तीला घाबरवून त्याच्याकडून पैशांची वसूली केली जाते. व्हॉट्सअपवर अनोळखी मुलीचा मॅसेज येतो. या मुलीच्या डिपीला सुंदर फोटो असतो. तिने मेसेज केल्यानंतर त्याला रिप्लाय दिला जातो. मग हळूहळू संवाद सुरू होतो त्यातून फोटो, व्हिडिओ शेअरिंग केली त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होतो. एका हिंदी दैनिकाच्या रिपोर्टरनं या प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन केले आहे. जवळपास 2 तास चॅट आणि न्यूड व्हिडिओचा प्रकार सुरू होता. 
व्हॉट्सअपवर मेसेज आला अन्...
व्हॉट्सअपवर एका अज्ञात नंबरवरून हायचा मेसेज आला. त्यानंतर त्याला रिप्लाय दिला. मग त्यानंतर व्हिडिओ कॉलवर सेक्स करोगे क्या? असा मेसेज आला. सेक्सटॉर्शनचा शिकार बनवण्यासाठी व्हिडिओ कॉलवर चेहरा महत्त्वाचा असतो. आरोपी - व्हिडिओ कॉलवर सेक्स करणार का? 
रिपोर्टर - हे काय असतं? मग व्हिडिओ कॉल आल्यानंतर रिपोर्टरनं फोनचा कॅमेरा साइडला केला. स्क्रीनवर एक मुलगी दिसते ती तिचा अदा दाखवत असते. त्यानंतर काही क्षणात हा कॉल कट होतो. 
रिपोर्टर - तुमचा फोटो पाठवा, व्हिडिओ कॉलमध्ये स्पष्ट दिसत नाही. 
आरोपी - लाल रंगाच्या कारसमोर लाल साडीत उभ्या असणाऱ्या महिलेचा फोटो पाठवतो. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ कॉल येतो. 
आरोपी म्हणतो तुमचा चेहरा दाखवा
रिपोर्टर - तुम्ही खूप सुंदर दिसता माझा चेहरा पाहून तुम्ही कॉल बंद कराल
आरोपी - तुम्ही तुमचा चेहरा दाखवा, मी तुमच्याशी बोलेन
त्यानंतर व्हिडिओ कॉलवर समोरील मुलगी तिचा चेहरा न दाखवता अश्लील चाळे करत असते. 
आरोपी - तुमचा चेहरा दाखवा
रिपोर्टर - माझा चेहरा चांगला नाही, तुमच्याशी बोलायला आवडतंय. 
आरोपी - तुमचा चेहरा दाखवा, मला मज्जा येत नाहीये. 
रिपोर्टर चेहरा दाखवत नाही म्हणून समोरून व्हिडिओ कॉल कट केला जातो.  त्यानंतर रिपोर्टर - फोन कट का केला, प्लीज असं करू नका
आरोपी - मला तुम्ही तुमचा चेहरा दाखवत नाही, त्यामुळे मला आवडत नाहीये. बाय
काही वेळाने पुन्हा व्हिडिओ कॉल येतो. त्यात न्यूड अवस्थेत मुलगी तिचा चेहरा न दाखवता अश्लील चाळे करत राहते आणि सांगते तुमचा चेहरा दाखवा.  रिपोर्टर चेहरा दाखवत नसल्याने समोरून शिवीगाळ करण्यात येते. चेहरा दाखवण्यासाठी दबाव येतो. त्यानंतर समोरील कॉलवरून जेन्ट्सचा आवाज ऐकायला येतो. तेव्हा तुम्ही जेन्ट्स आहात असं रिपोर्टर विचारतो. तेव्हा समोरून कॉल कट केला जातो. 
अनेक राज्यात पसरलंय जाळं
दिल्ली पोलीसचे स्पेशल सेल इंटेलिंजेस फ्यूजनचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी म्हटलं की, सेक्सटॉर्शन गँग फेसबुकच्या माध्यमातून बनावट फोटो बनवून पीडितांना शिकार बनवतात. व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करत सेक्सची मागणी करतात. त्यानंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड करून समोरच्या ब्लॅकमेल करतात. बनावट पोलीस अधिकारी, यूट्यूबर बनून पैशांची मागणी करतात. जर पैसे देण्यास नकार दिला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. त्याप्रकारे दिल्लीसह देशातील अनेक राज्यात ही टोळी अनेकांना जाळ्यात ओढते.