Independence Day : आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये झळकला तिरंगा

Independence Day : आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये झळकला तिरंगा

belgavkar.com | belgaum | belgavkar

अंतराळवीरांनी अंतराळातील स्पेस स्टेशन मध्ये झळकावला आहे

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हरघर तिरंगा अभियान सुरू आहे. प्रत्येक शासकीय मुख्यालयावर शासकीय कचेरीवर शाळा महाविद्यालय या सर्व ठिकाणी तिरंगा. मात्र आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये इंडो अमेरिकन अंतराळवीरांनी अंतराळातील स्पेस स्टेशन मध्ये झळकावला आहे. आणि हे विलोभनीय दृश्य फोटोमध्ये दिसत आहे अमेरिकेतील अंतराळवीर राजाचारी यांनी हे फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त त्यांनी अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये अंतराळवीरांनी तिरंगा फडकवला.

भारत स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना जगभरातूनच नव्हे तर अवकाशातूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय-अमेरिकन अंतराळवीर राजा चारी यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी संदेशासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS भारतीय राष्ट्रध्वजाचा फोटो पोस्ट करून देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या. फोटोच्या मागे पृथ्वी दिसत आहे. राजा चारी नुकतेच ISS येथे सहा महिन्यांच्या मोहिमेनंतर घरी परतले. मे महिन्यात मेक्सिकोच्या आखातात सुरक्षितपणे उतरलेल्या स्पेस एक्स अंतराळयानातील चार अंतराळवीरांपैकी ते एक आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Independence Day : आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये झळकला तिरंगा
अंतराळवीरांनी अंतराळातील स्पेस स्टेशन मध्ये झळकावला आहे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm