बेळगाव : बेळगाव महापालिका महापौर व उपमहापौर निवडणूक लवकरात घ्यावी

बेळगाव : बेळगाव महापालिका महापौर व उपमहापौर निवडणूक लवकरात घ्यावी

belgavkar.com | belgaum | belgavkar

वर्ष होत आले तरी अद्याप महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणुका होऊन वर्ष होत आले तरी अद्याप महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. नवे सभागृह अद्याप अस्तित्वात आले नसल्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. यासाठी महापौर व उपमहापौर निवडणूक लवकरात घ्यावी, अशी मागणी निर्वाचित नगरसेवकांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी प्रादेशिक आयुक्त के. पी. मोहनराज यांना निवेदन देण्यात आले.
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक वर्ष होत आले आहे. अजूनही महापौर व उपमहापौर निवडणूक झालेली नाही. तसेच नगरसेवकांचा शपथविधीही झालेला नाही. त्यामुळे प्रभागातील समस्यांबरोबरच विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या प्रभागाच्या आवश्यक विकासाच्या दृष्टीने त्या उपाययोजना करण्यासाठी महापौर व उपमहापौर निवडणूक लवकर होणे गरजेचे आहे. वेळेत निवडणूक न घेण्यात आल्यामुळे महापालिकेच्या कारभारावर परिणाम होत आहे. प्रशासनाने त्याचा विचार करुन लवकरात लवकर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवडणूक होऊन एक वर्ष झाले, तरी जाणीवपूर्वक महापौर - उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विलंब केला जात असल्याचा आरोप निर्वाचित नगरसेवकांनी केला. महापौर निवडणूक घेण्यास अडचण काय आहे, असा प्रश्नही यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केला. निवेदन देतेवेळी नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, पूजा पाटील, बसवराज मोदगेकर, बाबाजान मतवाले, मुज्जमील डोणी, रियाझ किल्लेकर, लक्ष्मी लोकरी, अझिम पटवेगार यांच्यासह सतरा प्रभागातील नगरसेवक उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळगाव महापालिका महापौर व उपमहापौर निवडणूक लवकरात घ्यावी
वर्ष होत आले तरी अद्याप महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm