बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा

बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव महानगरपालिका महापौर-उपमहापौर निवडणूक आरक्षण अखेर जाहीर

बेळगावचे महापौरपद सामान्य, तर उपमहापौरपद एससी महिलेसाठी

belgaum_belgavkar_gallery_belgav.jpg | बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा | belgaum news | belgavkar बेळगावकर
बेळगाव : बेळगावसह हुबळी-धारवाड महापालिकेचे महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण अखेर नगरविकास खात्याने जाहीर केले आहे. 24 व्या सभागृहासाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार बेळगावचे महापौरपद सामान्य प्रवर्ग (General), तर उपमहापौरपद एससी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव (SCW) असेल. सरकारने आता दोन्ही जागांसाठी आरक्षण जाहीर केले आहे.
महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया लवकरचं होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणुकीसंदर्भात प्रादेशिक आयुक्त कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधून जाणार आहे. लवकरच महापौर उपमहापौरपदाची निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार महापौरपद सामान्य प्रवर्ग तर उपमहापौरपद सामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव होते. पण, नगरविकास खात्याने सप्टेंबर 2019 चे आरक्षण लागू केल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरेमोड झाला. बेळगावची महापालिका निवडणूक 3 सप्टेंबर रोजी झाली असून 6 मार्च रोजी मतमोजणी झाली आहे. पण, महापालिका निवडणूक झाल्यावर नगरविकास खात्याने महापौर व उपमहापौर आरक्षणाबाबत स्पष्टीकरण देण्यास विलंब लावल्याने महापौर निवडणुकीला विलंब लागला. विलंबाला अनेक कारणे आरक्षणाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर महापालिकेने प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यास विलंब लावला. प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी नगरसेवकांचा पक्ष व प्रभाग आरक्षणाच्या माहितीसह नव्याने राजपत्रात नोंद करणे आवश्‍यक असल्याची सूचना दिली. त्यामुळे, महापालिका निवडणूक रखडली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा
बेळगाव महानगरपालिका महापौर-उपमहापौर निवडणूक आरक्षण अखेर जाहीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm