बेळगाव महानगरपालिकेच्या समोर केक कापून निषेध केला #HappyBirthday

बेळगाव महानगरपालिकेच्या समोर केक कापून निषेध केला #HappyBirthday

belgavkar.com | belgaum | belgavkar

निवडणूक होऊन एक वर्ष उलटून गेले तरी सदस्य सत्तेपासून वंचित आहेत.

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर लढवल्या गेलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह निर्विवाद यश मिळवलं आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या एकूण 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने 35 जागांवर विजय मिळवला आहे. बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. निवडणुकीला एक वर्ष झाले असतानाही सत्तेपासून वंचित राहिलेल्या नगरसेवकांनी आज कार्यालयाच्या आवारात केक कापून सरकारचा समाचार घेतला.
आज महानगरपालिकेच्या कार्यालयात काही नगरसेवक केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पुढे आले, मात्र महापालिका आयुक्तांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांनी निषेध व्यक्त करत कार्यालयाच्या आवारात बाहेर #birthday साजरा केलायं. आम्हाला निवडून एक वर्ष उलटले, महापौरपदाची निवडणूक अद्याप झालेली नाही, आम्हाला शपथही मिळालेली नाही. आम्हाला निवडून देणारे लोक समस्या घेऊन येत आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. यावेळी काँग्रेस, एमआयएम व काही अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव महानगरपालिकेच्या समोर केक कापून निषेध केला #HappyBirthday

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm