बेळगाव : गटारीचे पाणी जुन्या कपिलेश्वर तलावात, भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता

बेळगाव : गटारीचे पाणी जुन्या कपिलेश्वर तलावात, भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता

belgavkar.com | belgaum | belgavkar

अबबब...!
पाहा Video बेळगाव गणेशोत्सव. मुसळधार पावसात गणपती विसर्जन

तलावात मिसळले गटारीचे पाणी #SmartCityBelgaum


स्मार्ट सिटी बेळगाव शहरात गटरेत आणि नाल्यात वाहून जाणारं पाणी आता तलावात जातयं
बेळगाव : बेळगाव शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. शहर आणि आसपासच्या परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे जुन्या कपिलेश्वर तलावात दूषित पाणी मिसळल्यामुळे भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता.
रस्ते पाण्याखाली, तलावात मिसळले गटारीचे पाणी
कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या निदर्शनास ही बाब येताच किरण जाधव हे स्वतः कपिलेश्वर तलावाकडे केले. त्यांनी मराठा मंदिर बाजूच्या जक्कीन होंड येथे गणपती विसर्जन करण्याची विनंती केली.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे किरण जाधव यांनी तात्काळ जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सदर घटनेची कल्पना देऊन तात्काळ पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे. तसेच नवीन कपिलेश्वर तलावात गणपती विसर्जनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून द्या, जेणेकरून बेळगावच्या जनतेला अश्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच कपिलेश्वर तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा आयुक्तांकडे किरण जाधव यांनी केली आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांकडून देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र, आज आलेल्या अचानक पावसाने तयारीवर चांगलेच पाणी फेरले आहे. शहरामध्ये सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यानंतर ढग दाटून आल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसाने सगळीकडे पाणी करून टाकले. पाणी जाण्यास केलेले नाले कमी पडत असल्याने साठलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना परस्परांना आधार घेउन चालावे लागत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गटारीचे पाणी जुन्या कपिलेश्वर तलावात, भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता
अबबब...! पाहा Video बेळगाव गणेशोत्सव. मुसळधार पावसात गणपती विसर्जन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm