या मुलीची झोप ठरली सर्वात चांगली, या बदल्यात तिला किती लाख मिळाले असतील, अंदाज तर लावा

या मुलीची झोप ठरली सर्वात चांगली, या बदल्यात तिला किती लाख मिळाले असतील, अंदाज तर लावा

belgavkar.com | belgaum | belgavkar

सलग 100 दिवस रोज 9 तास झोपून सर्वोत्तम स्लीपर

आपल्याला जे आवडतं त्यासाठी आपल्याला कुणी पैसे दिले तर? फक्त झोपण्याचे कुणी पैसे दिले तर? कल्पना करा...! कोलकाताच्या 26 वर्षीय त्रिपर्णा चक्रवर्तीला तिच्या आवडत्या कामाचे 5 लाख रुपये मिळालेत. तिच्यासाठी हे एखाद्या स्वप्नासारखं होतं. झोपेची स्पर्धा असू शकते असं जर कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. त्रिपर्णा चक्रवर्ती ही भारताची पहिली स्लीप चॅम्पियन (India’s First Sleep Champion) बनलीये. सोशल मीडियावर झोपण्याच्या स्पर्धेबद्दल त्रिपर्णाला माहिती मिळाली. लहानपणापासूनच त्रिपर्णाला झोपायला खूप आवडतं. तिचे झोपेचे अनेक किस्से आहेत. ती कधी बोर्डाची परीक्षा देताना परीक्षा केंद्रात झोपायची, तर कधी नोकरीसाठी मुलाखत देताना झोपून जायची.
नुकतीच एका महागड्या गादी उत्पादक कंपनीने एक स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेत त्रिपर्णाने सलग 100 दिवस रोज 9 तास झोपून सर्वोत्तम स्लीपरचा पुरस्कार पटकावला. देशभरातील सुमारे साडेपाच लाख स्पर्धकांनी या झोपेच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्रिपर्णा एका अमेरिकन कंपनीत काम करते. सलग 100 दिवसात 9 तास झोपणारी त्रिपर्णा ही पहिली व्यक्ती आहे. अंतिम सामन्यादरम्यान झोपेवर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेचे एक शिष्टमंडळ त्रिपर्णाच्या घरी पाठविण्यात आले होते. उरलेल्यांना मागे टाकून त्रिपर्णाने झोपेच्या स्पर्धेचा मुकुट जिंकला. संस्थेच्या म्हणण्यानुसार, 100 दिवसांच्या या चॅलेंजमध्ये प्रत्येक स्पर्धकाला 9 तास झोपावे लागले. प्रत्येक स्पर्धकाच्या स्लीप स्कोअरमध्ये त्रिपर्णाने सर्वाधिक गुण मिळवले. तिचा स्लीप स्कोअर 100 पैकी 95 होता.
‘द फर्स्ट स्लीप चॅम्पियन ऑफ इंडिया’चा मुकुट मिळवलेल्या त्रिपर्णाने आयुष्यात कष्ट करणाऱ्या प्रत्येकासाठी झोप किती गरजेची आहे हे सांगण्यावर भर दिलाय. ती म्हणते, “पैसा हा कामाचा एक रोमांचक भाग असला, तरी मनाची शांती आणि यश मिळवण्यासाठी 8 तासांची चांगली झोप हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.”

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

या मुलीची झोप ठरली सर्वात चांगली, या बदल्यात तिला किती लाख मिळाले असतील, अंदाज तर लावा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm