बेळगाव : ज्योतिनगर (गणेशपुर) येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त BJP बेळगाव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री श्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत. बेळगाव भाजपा ग्रामीण मंडळच्या वतीने खूप चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे.
गरीब जनतेला याचा लाभ मिळणार आहे. यावेळी बेळगावच्या खासदार श्रीमती मंगल अंगडी, बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पाटील, भाजपा प्रवक्ते श्री. एम. बी. जिर्ली आदि उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली संदीप ढवाळे, अजय कुरबर, अरुण भोसले, प्रदीप पाटील, सुरेश घोरपडे आदींनी परिश्रम घेतले.