ना RRR, ना 'काश्मीर फाईल्स'.. भारताकडून ऑस्करसाठी 'या' चित्रपटाची अधिकृत एण्ट्री

ना RRR, ना 'काश्मीर फाईल्स'.. भारताकडून ऑस्करसाठी 'या' चित्रपटाची अधिकृत एण्ट्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

Oscars 2023 : 'छेल्लो शो' भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री

गुजराती सिनेमा छेल्लो शो हा भारताकडून ऑस्कर 2023 साठी अधिकृत एन्ट्री असणार आहे. गुजरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. ऑस्करच्या शर्यतीत राजामौली यांच्या RRR सिनेमची चर्चा होती, पण आता हा सिनेमा या शर्यतीतून मागे पडल्याचं स्पष्ट झालं आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं पुढील वर्षी होणाऱ्या अ‍ॅकेडमी अ‍ॅवॉर्डसाठी अर्थात ऑस्करसाठी गुजराती सिनेमा छेल्लो शो ची निवड केली आहे. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या कॅटेगिरीसाठी भारताकडून हा सिनेमा पाठवण्यात येणार आहे.
पान नलिन दिग्दर्शित या सिनेमात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीणा, दीपेन रावल आणि परेश मेहता हे प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचा प्रिमियर 2021 मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये छेल्लो शो नं 66 व्या वैलाडोलिड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन स्पाईक अ‍ॅवॉर्ड जिंकला होता. दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमांचं पोस्टर शेअर करत 'RRR' नाही, 'द काश्मिर फाईल्स' नाही तर 'लास्ट फिल्म शो' अर्थात 'छेल्लो शो' हा भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणारा अधिकृत सिनेमा आहे, असं म्हटलं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

ना RRR, ना 'काश्मीर फाईल्स'.. भारताकडून ऑस्करसाठी 'या' चित्रपटाची अधिकृत एण्ट्री
Oscars 2023 : 'छेल्लो शो' भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm