बेळगाव शहरात याठिकाणी विद्यार्थ्याने बुजविले खड्डे

बेळगाव शहरात याठिकाणी विद्यार्थ्याने बुजविले खड्डे

belgavkar.com | belgaum | belgavkar

विद्यार्थ्याने बुजविले पोस्टमन चौकातील खड्डे

बेळगाव : रेल्वेस्टेशन ते पोस्ट कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र केवळ 100 फूट रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे रेल्वेखात्याने दुर्लक्ष केले आहे. परिणामी पोस्टमन चौकात खड्डे निर्माण झाले आहेत. कॅन्टोन्मेंटनेदेखील कानाडोळा केल्याने एका शाळकरी मुलानेच चौकातील खड्ड्यांमध्ये दगड-माती घालून बुजविले आहेत. त्यामुळे या मुलाच्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पोस्टमन चौकात निर्माण झालेले खड्डे धोकादायक आहेत. हे लहान मुलांनादेखील कळू लागले आहे. पण रेल्वे आणि कॅन्टोन्मेंटच्या अभियंत्यांना कधी कळणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. पोस्टमन चौकातील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. रेल्वेस्टेशन ते पोस्टमन चौकापर्यंतचा रस्ता खराब झाला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून केवळ पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र केवळ 100 फूट रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात याठिकाणी विद्यार्थ्याने बुजविले खड्डे
विद्यार्थ्याने बुजविले पोस्टमन चौकातील खड्डे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm