सचिन तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा Video व्हायरल

सचिन तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा Video व्हायरल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बॅटिंग पॅड घालून दाखवलं कुकिंग कौशल्य;
पाहा व्हिडिओ

भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर सध्या रोड सेफ्टी लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. तो इंडिया लेजंड संघाचे नेतृत्व देखील करत आहे. दरम्यान, आपल्या लाडक्या सचिनला पुन्हा एकदा पॅड घालून, बॅट हातात घेऊन फलंदाजी करताना पाहणे ही चाहत्यांसाठी परवणीच असते. त्यामुळेच सचिनचे लेजंड लीगमध्ये खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. मात्र आता सचिन तेंडुलकरचा एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकर लेजंड लीगदरम्यान बॅटिंग करण्यासाठी पॅड घालून तयार झाला होता. मात्र या व्हिडिओत सचिन तेंडुलकर पॅड घालून बॅटिंग नाही तर कुकिंग करताना दिसत आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने 'फ्लिक असो वा फ्लिप ऑमलेट कायम परफेक्टच असलं पाहिजे.' असे कॅप्शन दिले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कुकिंगची देखील आवाड आहे.
सचिन तेंडुलकरने लेजंड लीगमधील इंडिया लेजंड आणि न्यूझीलंड लेजंड यांच्यात नुकताच एका सामना झाला. या सामन्याच्या पावसामुळे निकाल लागला नाही. सामन्यात फक्त 5.50 षटकेच टाकण्यात आली. न्यूझीलंड लेजंड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.इंडिया लेजंड्सकडून नमन ओझा आणि सचिन तेंडुलकर ही जोडी सलामीला आली होती. नमन ओझा 15 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. तर सचिन तेंडुलकरने 13 चेंडूत 19 धावा केल्या. सुरेश रैनाने देखील नाबाद 9 धावा केल्या होत्या. भारताच्या 5.5 षटकात 1 बाद 49 धावा झाल्या असताना पावसामुळे खेळात व्यत्य आला. त्यानंतर काही सामना सुरू झाला नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सचिन तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा Video व्हायरल
बॅटिंग पॅड घालून दाखवलं कुकिंग कौशल्य; पाहा व्हिडिओ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm