बेळगाव : PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

बेळगाव : PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाजपा (बेळगाव) ग्रामीण मंडळ

बेळगाव : भारतीय जनता पार्टी (बेळगाव ग्रामीण मंडळ) च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त भाजपा (बेळगाव) ग्रामीण मंडळ कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगावच्या खासदार श्रीमती मंगल अंगडी यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वनाने करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव, भाजपा राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली, माजी मंत्री व बेळगाव ग्रामीण जिल्हा प्रभारी श्री शशिकांत नाईक, यूवा मोर्चा अध्यक्ष श्री लिगराज हिरेमठ, पंकज घाडी, बसवराज दमानीसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगाव ब्लड बँकच्या वतीने बसवराज,संजय हंचनाळ व टीमने काम पाहिले. एकूण 72 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगराज हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली, गुरुराज हालगत्ती, येतेश हेब्बाळकर, मंथन सुतार, सचिन कांगले, बाळू पाटीलसह अनेक कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
भाजपा (बेळगाव) ग्रामीण मंडळ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm