IND vs AUS 2nd T2OI : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात पाऊस खेळ बघडवू शकतो?

IND vs AUS 2nd T2OI : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात पाऊस खेळ बघडवू शकतो?

belgavkar.com | belgaum | belgavkar

दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे ढग गडद झाले

India Vs Australia 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी 20 सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज (शुक्रवार 23 सप्टेंबर) सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये पाऊस पडत आहे. यामुळे दोन्ही संघाची सराव सत्रे देखील रद्द करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे ढग गडद झाले आहेत. दुसऱ्या टी 20 सामन्यात पाऊस खेळ बिघडवणार तर नाही ना अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
जरी गेल्या काही दिवसांपासून नागपुरात होत असलेल्या पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी अँक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी नागपूरचे तापमान सरासरी 29 डिग्री सेल्सियस असणार आहे. तर 64 भाग हा ढगांनी आच्छादलेला असणार आहे.दुसऱ्या सामन्याची नाणेफेक 6.30 ला होणार आहे तर सामना बरोबर अर्ध्या तासांनी सुरू होईल. जर सामना ज्यावेळी होणार आहे त्या वेळेच्या हवामान अंदाजाबाबत बोलायचे झाले तर या दरम्यान तापमान 26 डिग्री सेल्सियस इतके असले. सामना जसजसा पुढे सरकेल तसे तापमान हे साधारणपणे 25 डिग्री सेल्सियसच्या असापास राहण्याची शक्यता आहे.
भारताने मोहालीतील सामना गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1-0 ने पिछाडीवर पडला आहे. भारताने मोहालीत चांगली गोलंदाजी केली नाही. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 52 धावा दिल्या तर हर्षल पटेलने 4 षटकात 49 धावांची लयलूट केली. उमेश यादवने 2 षटकात 27 धावात देत 2 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने 2 षटकात 22 धावा दिल्या. भारताला 208 धावा डिफेंड करता आल्या नाहीत. कॅमेरून ग्रीनने 61 तर मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावांची खेळी केली. त्यापूर्वी भारतातडून हार्दिक पांड्याने 71 तर केएल राहुलने 55 धावा करत भारताला 20 षटकात 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारून दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

IND vs AUS 2nd T2OI : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात पाऊस खेळ बघडवू शकतो?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm