IPL 2023 : ठरलं...!
आयपीएलच्या 16व्या सीझनसाठी या तारखेला खेळाडूंचा लिलाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

किती असणार प्रत्येक टीमचं बजेट?

जुन्या फॉरमॅटनुसार IPL 2023 लीगचं आयोजन

आयपीएलच्या 16 व्या सीझनची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. 10 संघ पुढच्या मोसमात आधीच्याच फॉरमॅटमध्ये खेळणार असल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. कोरोनामुळे यंदाचे आयपीएल सामने मर्यादित शहरात आयोजित करण्यात आले होते. पण पुढच्या मोसमात मात्र प्रत्येक संघ होम-अवे सामने खेळणार आहे. त्यामुळे पुन्हा देशभरात आयपीएलचा उत्साह पाहायला मिळेल. त्यातच आता आगामी सीझनसाठी खेळाडूंच्या लिलावाबाबत एक अपडेट समोर आली आहे. आयपीएलच्या 16 व्या सीझनला मार्चच्या अखेरीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी 16 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार असल्याची माहिती आहे. या लिलावात प्रत्येक संघाला 95 कोटी रुपये खर्च करण्याची मुभा दिली जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम पाच कोटींपेक्षा जास्त आहे.
जुन्या फॉरमॅटनुसार लीगचं आयोजन
2020 आणि 2021 मध्ये आयपीएल स्पर्धा ही संयुक्त अरब अमिरातीत (UAE) भरवली गेली. ज्यात दुबई, शारजा आणि अबुधाबीमध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत सामने खेळवण्यात आले. त्यानंतर 2022 मध्ये आयपीएल भारतात परत आलं. पण कोरोनामुळे मर्यादित ठिकाणीच आयपीएलचे सामने खेळवण्यात आले. झाली. पण आता कोरोनाचं संकट आटोक्यात आल्यानं जुन्या फॉरमॅटप्रमाणे ही स्पर्धा घेण्याचं बीसीसीआयनं ठरवलं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

IPL 2023 : ठरलं...! आयपीएलच्या 16व्या सीझनसाठी या तारखेला खेळाडूंचा लिलाव
किती असणार प्रत्येक टीमचं बजेट?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm