belgaum-बेळगाव-nipani-rural-police-on-arrested-one-person-gaekwadi-nipani-district-for-possession-of-ganja-belgavkar-गायकवाडी-निपाणी-belgaum-202209.jpg | बेळगाव : गांजा जप्त, एकाला अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : गांजा जप्त, एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-निपाणी : गायकवाडी (ता. निपाणी) येथे गांजा बाळगल्याप्रकरणी निपाणी ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून एकाला अटक केली. केदार प्रल्हाद सुतार (वय 25, रा. कोडणी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताला अटक करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केदार गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून केदारकडून अर्धा किलो सुका गांजा जप्त केला. नोंदीप्रमाणे गांजाची किंमत 7000 रुपये होते.