belgaum-driver-was-killed-when-a-tractor-carrying-a-threshing-machine-overturned-at-khadaklat-खडकलाट-निपाणी-बेळगाव-belgaum-202209.jpg | बेळगाव : ट्रॅक्टरसह मळणी मशिन उलटून चालक ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : ट्रॅक्टरसह मळणी मशिन उलटून चालक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-निपाणी : खडकलाट येथे मळणी मशीन घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने चालक ठार झाला. दत्तात्रय सर्जेराव झिपरे (वय 42, रा. खडकलाट) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिसांत झाली आहे. दत्तात्रय झिपरे हे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नायककोडी शेतशिवारात ट्रॅक्टरसह मळणी मशीन घेऊन मळणीसाठी जात होते. दरम्यान अचानक ट्रॅक्टर पलटी झाला.
यामध्ये दत्तात्रय गंभीर जखमी झाले. त्यांना गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना गुरुवारी बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मयत दत्तात्रय यांचा भाऊ आनंदा यांनी खडकलाट पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.