बेळगाव : सर्वसामान्यांना आणखी एक 'शॉक'; वाढणार वीज बील

belgavkar.com | belgaum | belgavkar

वीज दरवाढीचा शॉक, प्रतियुनिट भार 35 पैसे

Karnataka Electricity Regulatory Commission (KERC)

बेळगाव : दगडी कोळसा महाग झाल्यामुळे वीज खरेदीसाठी वीज वितरण कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यापर्यंत इंधन समायोजन शुल्कामध्ये (फ्युअल अ‍ॅडजेस्टमेंट चार्ज-fuel adjustment costs) वाढ करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हेस्कॉमच्या कार्यक्षेत्रात ग्राहकांकडून प्रतियुनिट भार 35 पैसे वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील आणखी वाढला आहे.
कर्नाटक वीज नियंत्रण आयोगाने (केईआरसी) यासंबंधीचा आदेश दिला आहे. जुलै महिन्यातही केईआरसीने अशा पद्धतीने 31 पैसे दरवाढ केली होती. वीज नियंत्रण आयोगाच्या नियम 2013 नुसार हेस्कॉमने 1 सप्टेंबर 2022 रोजी 81.78 पैसे दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र केईआरसीने 35 पैसे दरवाढीला परवानगी दिली आहे. केंद्रीय विद्युत उत्पादन केंद्र (सीजीएस), कर्नाटक वीज पुरवठा निगम लि. (केपीटीसीएल) आणि उडुपी पॉवर कार्पोरेशन लि. (यूपीसीएल) कडून राज्यातील सर्व वीज वितरण निगम वीज खरेदी करतात. एप्रिल 2022 पासून जून 2022 पर्यंत एकूण 1,244 कोटी रुपये वीज खरेदी खर्चात बाढ झाली आहे. त्यामुळे वीज वितरण निगमकडून केईआरसीकडे फ्युअल अ‍ॅडजेस्टमेंट चार्ज वसुलीची परवानगी मागितली होती.