बेळगाव : नवीन घराच्या बांधकामावेळी भिंत अंगावर कोसळल्याने कामगार ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : नवीन घराच्या बांधकामासाठी कॉलमचा खड्डा खोदताना शेजारील घराची भिंत अंगावर कोसळल्याने कुली कामगार ठार झाला. गणपती तमन्ना इटगेकर (वय 40, रा. भारतनगर, वड्डर छावणी, खासबाग-शहापूर) असे त्याचे नाव असून, गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास टिळकवाडी पहिले रेल्वे फाटकानजीक मंडोळी रोड येथे ही घटना घडली.
गणपती हे कुली काम करत होते. विवेक अंबेकर यांच्या घरासाठी कॉलम उभारताना खड्डा खोदत असताना गुरुवारी सकाळी शेजारील घराची भिंत कोसळल्याने त्याखाली सापडून गणपती गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : नवीन घराच्या बांधकामावेळी भिंत अंगावर कोसळल्याने कामगार ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm