PM मोदींवर हल्ला..., जागो-जागी ब्लास्टचा कट; PFIच्या नापाक मनसुब्यांवर EDचा मोठा खुलासा

PM मोदींवर हल्ला..., जागो-जागी ब्लास्टचा कट;
PFIच्या नापाक मनसुब्यांवर EDचा मोठा खुलासा

belgavkar.com | belgaum | belgavkar

नापाक मनसुब्यांसाठी जमवले 120 कोटी रुपये...!

'देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला' धोक्यात'

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. 12 जुलैला त्यांच्या पटणा रॅलीमध्ये स्फोट घडविण्याची तयारी करण्यात आली होती. यासाठी पीएफआयचे टेरर मॉड्यूल घातक शस्त्रास्त्रे जमविण्याच्या कामास लागले होते. एढेच नाही, तर पीएम मोदींच्या रॅलीवर हल्ला करण्यासाठी ट्रेनिंग कॅम्पचे आयोजनही करण्यात आले होते, असा खळबळजनक खुलासा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे. याशिवाय, पीएफआयने यूपीमध्येही संवेदनशील ठिकाणी आणि महत्वाच्या लोकांवर एकाच वेळी हल्ला करण्याची तयारीही कोली होती, असेही ईडीने म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, जुलै महिन्यात पाटणा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयितांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तएवजांमध्ये 'इंडिया 2047' नावाने पीएफआयचे बुकलेटही होते. यात 2047 पर्यंत भारताला मुस्लीम देश बनविण्याचे 'दहशतवादी ब्ल्यूप्रिंट' होते. याच वेळी, पीएफआय आपल्या नापाक मनसुब्यांसाठी जागो-जागी ट्रेनिंग कॅम्प लावत आहे, असेही समोर आले होते.
ईडीने गुरुवारी केरळमधून अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या शफिक पायथच्या रिमांड नोटमध्ये खळबळजनक दावा केला आहे. PFI ने यावर्षी 12 जुलैला पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीदरम्यान हल्ल्या करण्याच्या उद्देशाने ट्रेनिंग कॅम्प लावला होता. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या निवडणूक रॅलीवर दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित जिहादी दहशतवाद्यांनी घडवून आणला होता.
देशभरात दंगे आणि दहशतवादी कारवाया करण्याच्या हेतूने PFI ने गेल्या काही वर्षांत 120 कोटी रुपये जमवले आहेत. या फंडात अधिकांस हिस्सा कॅशमध्ये आहे. ईडीकडे याची संपूर्ण माहिती आहे. राष्ट्रीय तपास संस्था आणि ईडीने गुरुवारी देशभरात पीएफआयविरुद्ध राबविलेल्या सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. एकूण 15 राज्यांमध्ये 93 ठिकाणी पीएफआयच्या कार्यालयांवर आणि संघटनेच्या काही नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. या कारवाईत स्थानिक पोलिसांचाही समावेश होता. 
UP मध्ये संवेदनशील ठिकाणांवर आणि काही महत्वाच्या लोकांवर एकाच वेळी हल्ला करण्याचा होता कट
ईडीने पीएफआयवर 'देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला' धोक्यात' टाकणाऱ्या कारवाया केल्याचा आणि कट रचल्याचा आरोप केला आहे. तपासादरम्यान पीएफआय आणि त्याचे सदस्य, यांच्या बँक अकाउंट्सचे विश्लेषणही करण्यात आले आणि आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

PM मोदींवर हल्ला..., जागो-जागी ब्लास्टचा कट; PFIच्या नापाक मनसुब्यांवर EDचा मोठा खुलासा
नापाक मनसुब्यांसाठी जमवले 120 कोटी रुपये...!

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm