बेळगाव : बेळगाव-सांबरा रस्ता चौपदरीकरणासाठी डीपीआर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानकापासून गांधीनगरमार्गे सांबला जात असताना दुपदरी रस्ता

बेळगाव : बेळगाव-सांबरा विमानतळ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी डीपीआर (ड्राफ्ट डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करावा, असे निर्देश शासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. वाहतूक सुलक्ष व्हावी यासाठी या रस्त्याचे चौपरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव-सांबरा रस्ता वर्दळीचा बनला आहे. त्यामुळे अलीकडेच या रस्त्याचे चौपरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे.
बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानकापासून गांधीनगरमार्गे सांबला जात असताना दुपदरी रस्ता लागतो. पण, वाहनांची वर्दळ वाढल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका सांबरा विमानतळावरुन बेळगावला येणाऱ्या किंवा येथून विमानतळाकडे जाणारे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना बसत आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बेळगाव-सांबरा रस्त्याच्या चौपरीकरण प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या दरम्यान अधिकाऱ्यांनी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे.