belgaum-fake-account-on-instagram-in-the-name-of-district-police-chief-belgaum-202209.jpg | पैसा लईच वंगाळ...! बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नावे बनावट इंस्टाग्राम खाते | belgaum news | belgavkar बेळगावकर

पैसा लईच वंगाळ...! बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नावे बनावट इंस्टाग्राम खाते

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : तुम्हाला Instagram, Facebook WhatsApp वर (Social Media) एखाद्याने मॅसेज करून लिहले असेल कि, 'मला पैसे पाठवा, मी या ठिकाणी अधिकारी म्हणून कार्यरत आहे, हवं तर चेक करा' तेव्हा तुम्ही चुकूनही त्या व्यक्तीला मॅसेज किंवा ओटीपी (OTP) देऊ नका, कारण असे केल्यास क्षणार्धात तुमच्या बँक अकाउंटमधील पैसे गायब होऊ शकतात नाहीतर तुम्हाला लुबाडलं जावू शकतं. कारण अशा पद्धतीने फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत.
बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडण्यात आले आहे. या माध्यमातून लोकांकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे. मी कोणतेही Instagram खाते उघडलेले नसून माझा फोटो व नाव वापरून बनावट खाते तयार करण्यात आले आहे. कोणीही पैशांचे व्यवहार करू नये. असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.