अंबाबाई मंदिर प्रशासनाला धक्का; ई-पेड पासला स्थगिती

अंबाबाई मंदिर प्रशासनाला धक्का;
ई-पेड पासला स्थगिती

belgavkar.com | belgaum | belgavkar

मंदिरात 200 रुपये आकारून वेगळी व्हीआयपी पेड दर्शन रांग

कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या ई-पेड पासला कोर्टाने स्थगिती दिली आहे. नियमांचं उल्लंघन करुन हा ईपेड पास सुरू करण्यात आला होता. त्याविरोधात कोर्टामध्ये याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे कोर्टाने ही स्थगिती दिली आहे. अंबाबाईच्या भक्तांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. या पासला सोमवारपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. कोल्हापूर अंबाबाई मंदिर प्रशासनाला हा धक्का मानला जात आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत पेड पासेस द्यायचे नाहीत, त्यांचा वापर करायचा नाही, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
यंदाच्या नवरात्रोत्सवात देवस्थान समितीने अंबाबाई मंदिरात 200 रुपये आकारून वेगळी व्हीआयपी पेड दर्शन रांग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना शासनाने 7 सप्टेंबर 2010 ला जाहीर केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना अमलात आणण्यासाठीचा दावा 15 ऑक्टोबर 2010 रोजी मंजूर होऊन शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे स्वतंत्र रांग करता येणार नाही, असे मुनीश्वर यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अंबाबाई मंदिर प्रशासनाला धक्का; ई-पेड पासला स्थगिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm