बेळगाव : गोवावेसजवळ दोघांनी अस लुटलयं.... स्वतःच मासा (ती महिला) जाळ्यात अडकलायं

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : लक्ष विचलित करून बसवाण गल्ली-खासबाग-शहापूर येथील एका वृद्धेच्या अंगावरील 19 ग्रॅमचे दागिने दोघा भामट्यांनी पळविले आहेत. गुरुवारी दुपारी गोवावेस येथील गणेश-मारुती मंदिराजवळ ही घटना घडली असून टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शांता शिवराम सुणगार (वय 65, रा. बसवाण गल्ली-खासबाग) या वृद्धेच्या अंगावरील 15 ग्रॅमचे मंगळसूत्र व 4 ग्रॅमची कर्णफुले असे एकूण लाखाचे दागिने भामट्यांनी पळविले आहेत.
शांता यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. गुरुवारी दुपारी 3 वाजता बॉन्ड झेरॉक्स करण्यासाठी नाथ पै सर्कलजवळील एका झेरॉक्स दुकानात या वृद्धा पोहोचल्या. त्यावेळी चॉकलेटी शर्ट घातलेला सुमारे 25 वर्षांचा तरुण तेथे आला. मी टीव्हीच्या दुकानात काम करतो. मालकांनी मला बाहेर काढले आहे, असे सांगितले. थोड्याच वेळात पिळव्या रंगाचा चौकडा शर्ट परिधान केलेला सुमारे 45 वर्षीय भामटा तेथे पोहोचला. या दोघा जणांनी आपल्याजवळील काळी प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली. या पिशवीत 1 लाख रुपये आहेत, हे तुम्ही ठेवून घ्या, असे सांगत चॉकलेटी शर्ट परिधान केलेल्या तरुणाला चहा पिण्यासाठी म्हणून यामधील 100 रुपये देण्यात आले. 1 लाख रुपये तुम्हीच ठेवून घ्या, असे सांगत ते पाकीट शांता यांच्या हातात देण्यात आले.
रक्कम वाटून घेऊया असे सांगून ऑटोरिक्षातून शांता यांना गोवावेसपर्यंत नेण्यात आले. त्यावेळी पिवळे शर्ट घातलेल्या भामट्याने तुमच्या अंगावरील दागिने काढून द्या, रुमालात बांधून देतो, असे सांगितले. भामट्यावर विश्वास ठेवून गळ्यातील मंगळसूत्र व कर्णफुले काढून दिले. रुमालात बांधून भाट्याने ते शांता यांच्या पिशवीत घातले. सोबत 1 लाख रुपये आहेत, असे सांगून काळे पाकीटही त्यांच्या हातात ठेवले. भामटे निघून गेल्यानंतर आपण फसलो गेलो, हे वृद्धेच्या लक्षात आले. रात्री टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.