कोणी गेम खेळतंय, कोणी तंबाखू मळतंय; भाजपा आमदारांचा विधानसभेतला व्हिडीओ व्हायरल

कोणी गेम खेळतंय, कोणी तंबाखू मळतंय;
भाजपा आमदारांचा विधानसभेतला व्हिडीओ व्हायरल

belgavkar.com | belgaum | belgavkar

विधानसभेतले दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत

उत्तरप्रदेश : समाजवादी पार्टीकडून विधानसभेतले दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ आहेत भाजपाच्या आमदारांचे. हे दोघेही सत्रादरम्यान गेम खेळताना आणि तंबाखू मळताना दिसून आले. समाजवादी पार्टीने ट्विट केलेल्या या दोन व्हिडीओमुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या लोकांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही. यांनी विधानसभेला फक्त मनोरंजनाचं ठिकाण बनवलं आहे. हे प्रकार लाजिरवाणे असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यातला पहिला व्हिडीओ महोबाचे आमदार राकेश गोस्वामी आहेत, असा दावा समाजवादी पार्टीने केला आहे. या व्हिडीओमध्ये गोस्वामी पत्त्यांचा खेळ खेळताना दिसत आहेत.
तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये झाशीचे आमदार रवी शर्मा दिसत आहेत. विधानभवनात बसून ते तंबाखूजन्य पदार्थ खाताना दिसत आहेत. त्यांनी खोकत रजनीगंधाचा डबा बाहेर काढला आणि आपल्या डेस्कखाली ठेवून ते खाताना दिसले. आता हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कोणी गेम खेळतंय, कोणी तंबाखू मळतंय; भाजपा आमदारांचा विधानसभेतला व्हिडीओ व्हायरल
विधानसभेतले दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm