petrol-bomb-hurled-on-rss-functionary-seetharaman-residence-at-chitlapakkam-in-tambaram-chennai-tamil-nadu-202209.jpeg | आता RSS कार्यकर्त्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; | belgaum news | belgavkar बेळगावकर

आता RSS कार्यकर्त्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला;

belgavkar.com | belgaum | belgavkar

चेन्नई : चेन्नईजवळील तांबरम येथील चितलापक्कम इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सीतारामन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बनं हल्ला करण्यात आला. पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तांबरम पोलिसांनी सांगितले. एएनआयच्या वृत्तानुसार, रात्री तांबरमजवळील RSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दोन बदमाशांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पल्लिकरणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः रात्रीच्या हल्ल्याची चौकशी करत असल्याचं अहवालात म्हटलंय. तर सीतारामन यांनी सांगितलं की, पहाटे 4 वाजता त्यांना मोठा आवाज आला आणि बाहेर आग लागल्याचं दिसलं.
त्यांना सुरुवातीला शॉर्ट सर्किट झालं असेल असं वाटलं, पण तसं झालं नाही. आम्ही ती आग विझवली आणि पोलीस अधिकाऱ्यांना बोलावलं, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. एनआयएनं तामिळनाडूमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर काही तासांनी अज्ञात व्यक्तींनी कोईम्बतूरमधील भाजप कार्यालय आणि कापड दुकानावर पेट्रोल बॉम्ब फेकला होता. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त नाही.