तस्करीची माहिती, संशय आला म्हणून मारुती कार थांबवली, हाती लागलं 55 कोटींचं सोनं...

तस्करीची माहिती, संशय आला म्हणून मारुती कार थांबवली, हाती लागलं 55 कोटींचं सोनं...

belgavkar.com | belgaum | belgavkar

कारमधून सुमारे 11 किलो सोने जप्त

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सोन्याच्या तस्करीचे प्रकरण सातत्याने समोर येत आहेत. आता कोलकात्याच्या रस्त्यावर 55 कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. बेलघरिया एक्स्प्रेस वेवर एका मारुती अल्टो कारमध्ये सुमारे 11 किलो सोने नेले जात होते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कार रस्त्यावर संशयास्पदरित्या पार्क केलेली आढळून आली. बेलघरिया पोलिसांनी कारची झडती घेत सोने जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकासह चौघांना अटक केली आहे. डीसी अजय प्रसाद यांनी सांगितले की, अटक केलेल्या लोकांकडे सोने कुठून आले आणि ते कोठून नेले जात होते याची चौकशी केली जात आहे.
माहितीनुसार, पोलिसांना याची आधीच माहिती होती. त्यामुळे त्या भागातील पोलीस आधीच सतर्क झाले होते. शुक्रवारी सकाळी बॅरकपूरजवळ उभी असलेली कार पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर कारची झडती घेतली असता 11 किलो सोने जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मारुती कारमधील एका बॅगेत अनेक सोन्याचे बार होते. प्राथमिक तपासानंतर कार बीटी रोडने मेदिनीपूरच्या दिशेने जात असल्याचा अंदाज त्यांनी लावला. प्राथमिक तपासात गाडीची नंबर प्लेट पश्चिम बंगालची असल्याचे निष्पन्न झाले आहे. मारुती अल्टो कारमधून सुमारे 11 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची पोलीस चौकशी करत आहेत. याआधीही कोलकाता विमानतळ आणि बीएसएफकडून मोठ्या प्रमाणात सोनं जप्त करण्यात आले आहे. बीएसएफने सोन्याच्या तस्करीबाबत तीन मोठ्या कारवाया केल्या आहेत.
हे सोनं कोणाचं आहे याचा तपास पोलीस करत आहेत. हे सोनं कुठे जात होते, याप्रकरणी बेलघरिया पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत. यासाठी अटक करण्यात आलेल्या सुरजित मुखर्जी, राजाराम पवार, मयूर मनोहर पाटील आणि गणेश चौहान यांना 14 दिवसांच्या पोलीस कोठडीचा अर्ज देऊन बराकपूर न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. चौकशीअंती सोन्याचा स्रोत शोधून काढण्यात पोलिसांना यश येईल, असे मानले जात आहे. कोलकाता लगतच्या भागात अलीकडच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

तस्करीची माहिती, संशय आला म्हणून मारुती कार थांबवली, हाती लागलं 55 कोटींचं सोनं...
कारमधून सुमारे 11 किलो सोने जप्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm