Alert...!
सर सलामत तो पगडी पचास, जरा सांभाळून, नोकरीचा हा मेल वाचून हुरळून जाऊ नका..

belgavkar.com | belgaum | belgavkar

डेटा एंट्री, मार्केटिंग, आयटी तसेच इतर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीचे आमिष

नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये 100 तरुणांना ओलीस ठेवण्यात आले आहे..

नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये 100 तरुणांना ओलीस (hostage) ठेवण्यात आले आहे. त्यातील 32 जणांची सूटका करण्यात आली आहे. IT Company मध्ये नोकरीच्या आमिषाने या विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले. आता पुन्हा तशाच प्रकारची ट्रिक वापरण्यात येत आहे. तेव्हा सावध रहा.. केंद्र सरकारने शनिवारी IT Skilled असलेल्या तरुणांसाठी सूचना जारी केली आहे. त्यानुसार, जॉब रॅकेट चालविणारे पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरी देण्याचे आमिष दाखविले आहे. या आमिषाला तुम्ही बळी पडला तर तुमची सूटका अशीच कोणत्या तरी देशातील जंगलातून करावी लागेल..
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याविषयीचा इशारा दिला आहे. त्यानुसार, थायलंड आणि अन्य पूर्वेतील देशांमध्ये विविध पदांसाठी गलेलठ्ठ पगारावर नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात येत आहे. फर्जी कॉल सेंटरवरुन कॉल करण्यात येतो. एसएमएस, ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात येतो  त्यानंतर नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येते. ऑनलाईन अथवा एखाद्या शहरात ऑफलाईन मुलाखतीची प्रक्रिया राबविण्यात येते. डेटा एंट्री, मार्केटिंग, आयटी तसेच इतर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीचे आमिष दाखवण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवण्यात येते. त्यासाठी व्हिसा आणि इतर गोष्टींचा खर्चही करण्याचा दावा करण्यात येतो.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Alert...! सर सलामत तो पगडी पचास, जरा सांभाळून, नोकरीचा हा मेल वाचून हुरळून जाऊ नका..
डेटा एंट्री, मार्केटिंग, आयटी तसेच इतर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीचे आमिष

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm