belgaum-बेळगाव-belgaum-basarikatti-missing-youth-committed-suicide-by-jumping-into-the-well-belgavkar-belgaum-20221132.jpg | बेळगाव : त्या तरुणाची आत्महत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : त्या तरुणाची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेपत्ता झालेल्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे उघडकीस आली. लक्ष्मण दिलीप नागरोळी (वय 32) असे त्याचे नाव असून, घटनेची नोंद मारिहाळ पोलिस स्थानकात झाली आहे. लक्ष्मण हा सेंट्रींग काम करत होता.
आर्थिक कारणांमुळे बुधवारी सायंकाळी कोणालाही न सांगता तो घरातून बाहेर पडला होता. गुरुवारी सकाळी गावातील देसाई यांच्या विहिरीत एक मृतहेद तरंगताना काहींच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक महांतेश बस्सापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासाठी HERF या संस्थेने मदत केली.