बेळगाव-गोवा मार्गावरील चोर्ला घाटात कार थेट 60 फूट खोल दरीत कोसळली

बेळगाव-गोवा मार्गावरील चोर्ला घाटात कार थेट 60 फूट खोल दरीत कोसळली

belgavkar.com | belgaum | belgavkar

दोघे जागीच ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले

बेळगाव : बेळगाव-गोवा मार्गावरील चोर्ला घाटात सुरू असलेले अपघातांचे सत्र सुरूच आहे. धोकादायक वळणाचा रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने कार थेट 60 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवरील वाईल्डर नेस्ट रिसॉर्ट जवळील वळणावर हा अपघात घडला. या अपघातात नूर तनुद्दिन शेख (वय 36) आणि सुधीर आत्माराम परब (वय 35, दोघेही रा. पालघर, महाराष्ट्र या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एन्ड्रयू फर्नांडिस (वय 63), संतोष भवर (वय 28), नुराणी सौदागर (वय 53), विनोद कामत (वय 43) सर्वजण रा. पालघर हे गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातून बेळगावमार्गे कारने हे सर्वजण जुने गोवा येथील फेस्टला जात होते.
गोव्याच्या हद्दीत प्रवेश करताच चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने कार रस्ता सोडून बाजूला गेली. ती थेट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर साखळी येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून बांबोली येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. दरम्यान रात्रीच्या वेळी अपघात घडल्याने वाळपई पोलिसांना या घटनेची उशिरा माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले.
रुग्णवाहिकेतून त्यांना बांबोली इस्पितळात हलवले. तसेच वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दोरीच्या सहाय्याने गाडीत अडकून पडलेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याकामी श्रीकांत गावकर, रामा नाईक, महादेव गावडे, सुधाकर गावकर या अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास अथक प्रयत्न करून दरीतून कार बाहेर काढली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव-गोवा मार्गावरील चोर्ला घाटात कार थेट 60 फूट खोल दरीत कोसळली
दोघे जागीच ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm