बेळगाव : मुंगूस चावल्याने जखमी झालेल्या मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. हनुमंत सोमाप्पा नायक (वय 10, रा. भेंडीगिरी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिसांत झाली आहे. हनुमंत परसामध्ये खेळत असताना 1 डिसेंबर रोजी मुंगसाने त्याचा चावा घेतला होता. त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.